Home कोरची हिराजी मुकुंदराव रामटेके हे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

हिराजी मुकुंदराव रामटेके हे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

0
31

 

कोरची:-

दिनांक 05 नोव्हेंबरला 2023 ला श्री गुरुदेव सेवाश्रम आग्याराम देवी चौक नागपूर येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये हिराजी एम. रामटेके (केंद्रप्रमुख) केंद्र कोरची प.स. कोरची यांना अतिशय मानाचा मानला जाणारा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले.

सदर पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वे करण्यात आले होते व त्यामधून आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची नावे या पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात आली होती.

सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले, अध्यक्ष म्हणून गिरीश पांडव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभिजीत वंजारी नागपूर पदवीधर मतदारसंघ, एडवोकेट किरण सरनाईक अमरावती विधान परिषद शिक्षण मतदारसंघ, देवेंद्र दोडके अभिनेता, अनिल नगरारे सरचिटणीस अ. भा. काँग्रेस कमिटी, नरेश खडसे कार्यकारी अध्यक्ष मदत फाउंडेशन, दिनेश वाघमारे सचिव तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या अतिशय मानाच्या अशा पुरस्कारासाठी गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातून हीराजी रामटेके यांची निवड झाली व त्यांना हा समाज रत्न पुरस्कार देण्यात आला ही अतिशय गौरवाची बाब असून मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांनी कोरची तालुक्याचा मान उंचावलेला आहे तरी कोरची तालुक्यातील सर्व शिक्षकवृंद कडुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here