Home कोरची जि.प.कोरची शाळेत म.गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न

जि.प.कोरची शाळेत म.गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न

0
27

कोरची::

येथील स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथे स्वच्छता पंधरवाडा नियोजननिहाय विविध उपक्रम राबविण्यात आले. आज दि.2 ऑक्टोबर 2023 रोज सोमवार ला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रमोदिनी काटेंगे, उद्घाटक कांता साखरे तर प्रमुख पाहुणे आरती चांदेकर, महेश जाळे
यांनी भूषविले. काही विद्यार्थ्यांनी म.गांधीजी व कस्तुरबा गांधी यांची वेशभूषा करून आलेले होते. निधी काटेंगे वर्ग 2 रा हिने अतिशय सुरेख शब्दामध्ये भाषण दिले. साक्षी मेश्राम, पवन बांगरे ,अर्णवी सहारे ,मोनाली सिंद्राम, राशी बांगरे, करिश्मा धोंडणे यांनी भाषण आणि गितगायन केले. आजच्या कार्यक्रमाचे संचालन मोनाली सिंद्राम तर आभार पवन बांगरे याने मानले. स्वच्छता पंधरवाडय़ामध्ये स्वच्छता घोषवाक्य स्पर्धा व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. कोरची नगरामध्ये स्वच्छता रॅली काढण्यात आली. शाळा व परिसर स्वच्छ करण्यात आले. यांकरिता शाळेचे मुख्याध्यापक अरविंद टेंभूरकर ,शिक्षिका कांता साखरे, प्रमोदिनी काटेंगे, आरती चांदेकर, मेघा बुराडे, शिक्षक मारोती अंबादे, महेश जाळे, विनोद भजने यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here