कोरची
कोरची तालुक्यापासून 40 किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम कोटगुल येथील को-ऑपरेटिव्ह बँक शाखेचे मागील आठवडाभरापासून लिंक फेल असल्यामुळे परिसरातील ग्राहकांना मनस्ताप होऊन अनेक त्रास सहन करावे लागत आहे. परिसरातील अतिदुर्गम भागातील ग्राहकांना सकाळी दहा वाजता पासून सायंकाळी चार वाजता पर्यंत पैसे काढण्यासाठी बसून राहावे लागते. तर ग्राहकांना इमर्जन्सी मध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा पासबुक मध्ये शिल्लक पैसे किती आहे हे बघायचे असेल तर बँकमधील लिंक फेल मुळे बघता येत नाही.
यासंदर्भात ग्राहकांनी येथील शाखा प्रबंधक जांभूळकर यांना विचारणा केली तर ते लिंक फेल समस्या संबंधीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सांगितले आहे जिल्ह्यावरून लवकरच लिंक फेल सुधार करण्यासाठी टीम येणार आहेत तेव्हा ही सुधारणा केली जाईल असे सांगितले जात आहेत. तर दुसरीकडे अत्या आवश्यक सेवेसाठी ग्राहकांना पैशाची गरज असते त्यांना वेळेवर सेवा मिळत नसणारे ग्राहकांना ताडकळत त्या ठिकाणी राहावं लागत आहे. येथील पासबुक एन्ट्री मशीन मागील एक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे.
सध्या सकाळी बँकेकडून ग्राहकांचे विड्रॉल जमा केले जाते त्यानंतर सायंकाळी चार वाजता त्यांचे विड्रॉल चे पैसे वाटप केले जात आहे. येथील ग्राहकांना वेळेवर सेवा मिळायला हवे लहान लहान बाळ घेऊन महिला व वयोवृद्ध ग्राहकांना खूप त्रास होत आहे त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ सेवा सुरळीत करावे अन्यथा बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव करण्यात येईल असे ग्राहकांनी इशारा दिले आहे.


