Home गडचिरोली कलापथक पथनाट्यातून शासकिय योजनांची जनजागृती आरमोरी….

कलापथक पथनाट्यातून शासकिय योजनांची जनजागृती आरमोरी….

0
56

आरमोरी…. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय गडचिरोली व मानव विकास बहुउद्देशिय कला मंडळ चूरमुरा यांच्या संयुक्त माध्यमातुन देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांत कलापथक व पथनाट्यातुन शासकिय योजनांची माहिती नागरिकांना देऊन जनजागृती करण्यात आली.

देसाईगंज तालुक्यातील चिखली किन्हाळा, डोंगरगाव, विहीरगाव, विसोरा, डोंगरमेंढा, कसारी, चोप, शंकरपुर, कोरेगाव, पिंपळगाव, पोटगाव येथे शासनाच्या विविध योजना, समाज कल्याण विभागा मार्फत अनुसुचित जाती करिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, व जिल्हा वार्षिक योजनेची माहिती कलापथकाच्या माध्यमातुन डेण्यात आली.

कलापथक मंडळाचे अध्यक्ष तथा कलावंत लोकशाहीर विजय शेंडे व त्याच्या संचाने पथनाट्य, गीते, व संवाद कार्यक्रमातून विविध शासकिय योजनांचा जागर केला. यात सुधाकर भोयर, सोमंनाथ मानकर, तुळशीराम उंदीरवाडे, कुमदेव बोरकुटे, श्यामराव कुकुडकर, आशीष लोणारे, लोपा शेंडे, रागिणी रंगारी आदी कलावंतांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here