Home Breaking News माता रमाई ने केलेल्या त्यागामुळेच बाबासाहेब घडले…. पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे

माता रमाई ने केलेल्या त्यागामुळेच बाबासाहेब घडले…. पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे

0
67

आरमोरी…. बाबासाहेब आंबेडकरांच्या यशात त्यागमूर्ती रमाईचे योगदान मोठे आहे . अनेक हाल अपेष्टा सहन करून माता रमाईने बाबासाहेबांची सावली बनून काम केले. बाबासाहेब आंबेडकर घडले ते रमाईच्या त्यागामुळेच! आजच्या काळात रमाई सारखी माता होने शक्य नाही. रमाई चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी कार्य केले पाहिजेत असे प्रतिपादन आरमोरीचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यानी केले.

समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, प्रा. प्रशांत झिमटे, प्रा. अमरदिप मेश्राम, महेन्द्र रामटेके, समता युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश अंबादे हे होते.

कार्यक्रमात त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम म्हणाले की… त्या काळात रमाईने जे कष्ठ उपसले. म्हणूनच बाबासाहेब परदेशात जाऊन व उच्च शिक्षण घेऊन या देशातील न्याय हक्क व अधिकारापासून वंचित असलेल्या लोकासाठी झटले, त्यांना न्याय मिळवून दिला. आजच्या युवकांनी उच्च शिक्षण घेऊन मोठे व्हावे व संघटित होऊन समाजाची व देशाची सेवा करावी असेही ते म्हणाले…

संचालन प्रा. प्रशांत झिमटे यानी तर आभारप्रदर्शन प्रा अमरदीप मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला मंगेश पाटील, सौरभ उंदीरवाडे, रुपेश जवंजाळकर, सौरभ मस्के, विकास बारसागडे, आदित्य चिलबुले, हर्षल खोब्रागडे, अभिषेक खुने, मंथन डीडरे, आदित्य सोनटक्के सह समता युवा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here