देसाईगंज – गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी सेवा दल यांच्यामार्फत देसाईगंज येथील श्री भिमराव लक्ष्मण नगराळे काँग्रेसचे माजी नगरसेवक यांची तालुका काँग्रेस कमिटी सेवा दलाच्या शहरध्यक्ष पदावर सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजीवकुमार गारोदे यांनी नियुक्ती केली आहे.
नगराळे यांचे पक्षासाठी केलेले कार्य, व जनसामान्यांसाठी केलेले कार्य, समाजाप्रती त्यांची तळमळ, पाहू जाता, पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता व देसाईगंज तालुक्यात सेवादल संघटन मजबूत करण्याकरिता सर्व पदाधिकारी यांच्याशी एकनिष्ठ राहून नगराळे यांना सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजीव कुमार गारोदे यांनी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती केली आहे.
नगराळे यांनी आपल्या निवडीचे श्रेय माजी आमदार आनंदराव गेडाम, गडचिरोली काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, विलासबापू औताडे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल, राजीवकुमार गारोदे जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल गडचिरोली, विश्वास भोवते माजी समाजकल्याण सभापती गडचिरोली, रजनीकांत मोटघरे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनु.जाती सेल, राजेंद्र बूल्ले अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज, नरेंद्र गजपूरे जेष्ठ कार्यकर्ते देसाईगंज, नितीनभाऊ राऊत तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष, पंकज चहांदे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष देसाईगंज, विक्की डांगे यु.काँ. शहरध्यक्ष, युवराज उईके, नरेश लिंगायत, विलास लोखंडे, बंदुभाऊ तांबे आदींना दिले आहे.

