आरमोरी….केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजनेंतर्गत विमा काढलेल्या मृतकाच्या वारसदारांना याचा लाभ मिळत आहे.नुकताच आरमोरी बर्डी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत मृतकाचे वारसदार श्रीकांत लक्ष्मण गळमळकर याना दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
आरमोरी येथील प्रतिमा श्रीकांत गळमळकर यानी आरमोरी बर्डी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत प्रति वर्ष ४३६ रुपये याप्रमाणे विमा काढला होता.मात्र त्यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते..याची दखल घेऊन शाखा व्यवस्थापक भोजराज चांदेवार यांनी मृतकाच्या वारसदारांना विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यालयीन बाबीची पूर्तता केली.
मृतकाचे वारसदार श्रीकांत गळमळकर याना बँकेच्या सभागृहात एका कार्यक्रमात दोन लक्ष रुपयांचा धनादेश शाखा व्यवस्थापक भोजराज चांदेवार यांचा हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी बँकेचे लिपिक आर.पी.मने,सी. डी. बनकर,सौ. डी. डी. पेट्टेवार,बँक सखी प्रणाली भोयर, , उपस्थित होते.
बँकेच्या खातेदारांनी प्रधानमंत्री सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजनेचा विमा काढावा असे आवाहन शाखा व्यवस्थापक भोजराज चांदेवार यांनी केले आहे.


