![]()
रोशन–करूणा विवाहबंधनात; आत्राम परिवाराची प्रमुख उपस्थिती, नवदांपत्यास दिल्या शुभेच्छा
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कासमपल्ली येथे रोशन ईष्टाम आणि करूणा तलांडे यांच्या शुभ विवाह सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा मंगल सोहळा पार पडला.
कासमपल्ली येथील चि. रोशन (सौ. सेंकरीबाई तथा श्री. संन्याशी ईष्टाम यांचे द्वितीय चिरंजीव) आणि टेकूलगुडा येथील चि. सौ. कां. करूणा (सौ. लक्ष्मीबाई तथा श्री. जनार्धन तलांडे यांची द्वितीय कन्या) हे विवाहबंधनात अडकले. सदर विवाह सोहळा कासमपल्ली येथील वरांच्या मंडपात पार पडला.
या मंगल प्रसंगी मा. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम, सिनेट सदस्य गडचिरोली तसेच मा. हर्षवर्धन बाबा आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य अहेरी यांनी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी नवविवाहित जोडप्याला भेटवस्तू प्रदान करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा व्यक्त केल्या.
विवाह सोहळ्याला अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, सारिकाताई गडपलीवार, बालाजी गावडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
हसऱ्या चेहऱ्यांनी, मंगलमय वातावरणात आणि शुभेच्छांच्या वर्षावात पार पडलेला हा विवाह सोहळा उपस्थितांसाठी आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण ठरला.