Home Breaking News आलापल्ली वन विभागात बोगस मजूर प्रकरणाचा मोठा आरोप!

आलापल्ली वन विभागात बोगस मजूर प्रकरणाचा मोठा आरोप!

0
24

 

🛑 “६०० व्हाऊचर बिलांपैकी शेकडो संशयास्पद बिलांचे पुरावे चौकशी समितीकडे सादर”

गडचिरोली : आलापल्ली वन परिक्षेत्रातील कथित बोगस मजूर, व्हाऊचर बिल आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर कालुराम ढोलगे यांनी त्रिस्तरीय चौकशी समितीसमोर उपस्थित राहून कथित बोगस मजूरांची यादी व व्हाऊचर बिलांचे पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे.

चौकशी व्हिडीओग्राफीद्वारे पारदर्शक पद्धतीने व्हावी,

कथित मजुरांचे लेखी बयान, बँक खात्यांची तपासणी व RTGS व्यवहारांची चौकशी व्हावी,

क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक यांचेही बयान नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.

“निष्पक्ष चौकशी न झाल्यास पोलीस व लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत पुनर्चौकशीची मागणी करू” असा इशाराही देण्यात आला आहे.

आता सर्वांचे लक्ष त्रिस्तरीय चौकशी समितीच्या अहवालाकडे लागले असून, या आरोपांमध्ये किती तथ्य समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

— महा Express News Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here