Home Breaking News आरमोरी शहरातील पाण्याची समस्या केव्हा संपणार…..

आरमोरी शहरातील पाण्याची समस्या केव्हा संपणार…..

0
62

आरमोरी शहरातील पाण्याची समस्या कायम

आरमोरी..,

…. पाणीपुरवठा योजनेच्या वैनगंगा नदी जॅकवेलवर कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने मागील आठ दिवसांत चार सबमर्सिबल पंप जळाले आहेत. त्यामुळे पुन्हा आरमोरी शहराचा पाणीपुरवठा काही दिवस बंद राहणार असल्याचे नगर परिषदेने कळविले आहे.

 

महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या सबमर्सिबल पंपामध्ये वारंवार बिघाड येत आहेत. जॅकवेलवर एकूण चार पंप होते. त्यापैकी चारही पंप जळाले आहेत. त्यापैकी एक पंप रविवारी दुरूस्त होऊ शकतो.

 

मात्र जोपर्यंत ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड दुरुस्त होत नाही. तोपर्यंत पंप चालू करणे कठीण आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे नगर परिषदेने कळविले आहे. यापूर्वीही काही दिवस आरमोरी शहराचा पाणी पुरवठा बंद होता. त्यामुळे आरमोरी शहरातील पाण्याची समस्या केव्हा सुटेल हा गंभीर प्रश्न आरमोरी शहरातील नागरिकांना भेडसावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here