Home Breaking News कमलापूर जंगलात आगीचा तांडव! वनविभागाचे दुर्लक्ष; हत्तींसह वनसंपत्ती धोक्यात

कमलापूर जंगलात आगीचा तांडव! वनविभागाचे दुर्लक्ष; हत्तींसह वनसंपत्ती धोक्यात

0
27


शासकीय हत्ती कॅम्प परिसरात भीषण आग; मौल्यवान जंगल जळून खाक होण्याची भीती

गडचिरोली : जंगलाला आगी लागू नयेत यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी सिरोंचा वनविभागांतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कमलापूर–दामरांच्या मार्गालगत असलेल्या जंगल परिसरात भीषण आग लागून आगीने अक्षरशः तांडव मांडल्याचे चित्र समोर आले आहे.

विशेष म्हणजे, या परिसरात शासकीय हत्ती कॅम्प असून सुमारे नऊ हत्ती येथे वास्तव्यास आहेत. अशा संवेदनशील ठिकाणी आग लागूनही त्वरित नियंत्रणासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. आगीच्या विळख्यात अडकलेल्या जंगलामुळे हत्तींसह इतर वन्यप्राण्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या आगीमुळे मौल्यवान वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात जळून खाक होत असून पर्यावरणीय नुकसानही प्रचंड होत आहे. मात्र, सिरोंचा वनविभाग तसेच कमलापूर वनपरिक्षेत्रातील संबंधित कर्मचाऱ्यांचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांकडून तात्काळ उपाययोजना करून आग आटोक्यात आणण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा, या आगीमुळे संपूर्ण परिसरातील जैवविविधतेला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वनविभागाने तातडीने लक्ष देत आग नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचलावीत, अन्यथा मोठ्या पर्यावरणीय संकटाला सामोरे जावे लागेल, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here