Home Breaking News अहेरीत HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात; विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा टप्पा

अहेरीत HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात; विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा टप्पा

0
13

 

गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधासाठी लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले; पालक-विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अहेरी ! : भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी येथे HPV (ह्युमन पॅपिलोमाव्हायरस) लसीकरणाबाबत पालक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये HPV विषाणू, त्यापासून होणारे आजार तसेच लसीकरणाचे महत्त्व याबाबत योग्य माहिती पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य शाहिद शेख यांच्या हस्ते प्रमुख मार्गदर्शक डॉ. लुबना हकीम (वैद्यकीय अधिकारी) व राशिद शेख (आरोग्य सेवक) यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी डॉ. लुबना हकीम यांनी HPV विषाणूची माहिती देताना तो कसा पसरतो, त्यापासून होणारे आजार—विशेषतः गर्भाशय मुखाचा कर्करोग—याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींसाठी HPV लस किती आवश्यक आहे, कोणत्या वयोगटात ती घ्यावी, लसीचे डोस कसे दिले जातात आणि लसीकरण सुरक्षित व प्रभावी कसे आहे, याची स्पष्ट माहिती त्यांनी दिली.

आरोग्य सेवक राशिद शेख यांनी शासकीय आरोग्य विभागाच्या विविध योजना, लसीकरणाचे वेळापत्रक तसेच उपलब्ध सुविधा याबाबत माहिती देत पालकांना आपल्या मुलींचे लसीकरण वेळेत करून घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी व पालकांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे देत जनजागृती अधिक प्रभावी केली.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे HPV लसीकरणाबाबत जागरूकता वाढून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here