Home Breaking News अवैध वृक्षतोड आणि थुटावर हातोळा मारून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न;आलापल्ली वनविभागात चाललाय तरी...

अवैध वृक्षतोड आणि थुटावर हातोळा मारून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न;आलापल्ली वनविभागात चाललाय तरी काय ?

0
31

 

अवैध वृक्षतोड आणि थुटावर हातोळा मारून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न;आलापल्ली वनविभागात चाललाय तरी काय ?

गडचिरोली: आलापल्ली वनविभागातील एका वनपरिक्षेत्रात मोठ्याप्रमाणात अवैध वृक्षतोड झाल्याची बाब उजेडात आली आहे.विशेष म्हणजे मौल्यवान झाडांची कत्तल करून थुटावर हातोळा मारून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला असल्याचे पुरावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या अवैध वृक्षतोडी प्रकरणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.सदर प्रकरण उघडकीस आल्यावर वन विभागातर्फे थातूरमातूर चौकशी करण्यात आली असून अद्यापही कोणताही वनगुन्हा दाखल करण्यात आला नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे.संबंधित कर्मचारी व अधिकारी अजूनही या प्रकरणावर मौन बाळगत आहेत.त्यामुळे या प्रकरणाने आलापल्ली वनविभागातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वन विभागाचे अधिकारी अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ की कारवाई करणार ? किंव्हा हे प्रकरणही वनखात्याच्या फाइलमध्ये दफन होईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आलापल्ली वन विभागात नवनवीन प्रकरण समोर येत असून स्थानिक नागरिकांतून रोष व्यक्त होत आहे. वन संरक्षणाच्या नावाखाली चाललेल्या भ्रष्टाचारावर लगाम घालण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व पारदर्शक कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आलापल्ली वन विभागात आलापल्ली, पेरमिली,अहेरी, पेडिगुडम,घोट,मार्कंडा,चामोर्शी आदी वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश असून सदर घटनेने ‘त्या’ वनपरिक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here