Home Breaking News जि.प. उच्च प्राथमिक शाळा गट्टा येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जि.प. उच्च प्राथमिक शाळा गट्टा येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

0
27

 

एटापल्ली : गट्टा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिकशाळेत थोर समाजसुधारिका, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बेडके होते. शिक्षक टेकाम, धुर्वे, उईके, नरोटे, गोटा तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. स्त्री शिक्षण, समाजप्रबोधन व समतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मांडली.

मुख्याध्यापक बेडके यांनी मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here