Home Breaking News *सेवाविषयक मागण्या आणि निलंबनाच्या विरोधात पटवारी संघाचे आंदोलन सुरू*

*सेवाविषयक मागण्या आणि निलंबनाच्या विरोधात पटवारी संघाचे आंदोलन सुरू*

0
50

*सेवाविषयक मागण्या आणि निलंबनाच्या विरोधात पटवारी संघाचे आंदोलन सुरू.

गडचिरोली :-  संघटनेने १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्या निकाली काढण्याची विनंती केली होती. त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, ग्राम महसूल अधिकारी कु. अश्विनी सडमेक व मंडळ अधिकारी श्री. राजु खोब्रागडे यांचे निलंबन अन्यायकारक असल्याचे सांगत त्यावरही पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आंदोलनाची रूपरेषाः

३१ ऑक्टोबरः काळी फित लावून कामकाज
३ नोव्हेंबरः तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे
६ नोव्हेंबरः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
७ नोव्हेंबरः डिजिटल स्वाक्षरी (DSC) तहसील कार्यालयात जमा
१० नोव्हेंबरपासूनः मागण्या मान्य होईपर्यंत सामूहिक रजा संघटनेच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षभरात एकही बैठक न घेता प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले आहे. निलंबनाच्या घटनांमुळे कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला असून, मनोबल खच्चीकरण होत आहे. संघटनेने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना प्रतिलिपी पाठवून आंदोलनाची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here