Home आरमोरी नव्याने तयार केलेली जिल्हा नियोजन समिती म्हणजे थोपविलेली समिती :-माजी आमदार डॉ....

नव्याने तयार केलेली जिल्हा नियोजन समिती म्हणजे थोपविलेली समिती :-माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी

0
26

 

 

हल्ली राज्यात भारतीय जनता पार्टी ही शिवसेना पक्षातील एक गट म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना गटाशी एकत्र येऊन महाराष्ट्रातील सत्ता चालवीत आहेत. मुख्यमंत्री हे शिवसेना गटाचे म्हणजेच मा. श्री. एकनाथ शिंदे आहेत. मात्र दिनांक 17 मे 2023 ला गडचिरोली जिल्हा नियोजन समिती बनविण्यात आली. या जिल्हा नियोजन समिती मध्ये एकनाथ शिंदे शिवसेना गटातील कोणत्याच कार्यकरत्याला समिती मध्ये समाविष्ट करून समितीमध्ये स्थान देण्यात आले नाही. हे अधिकच धक्कादायक असून, भारतीय जनता पार्टीच्या स्वार्थी व कपटनीतीचा जिवंत उदाहरण असून, पूर्णतः अन्यायकारक असल्याचे माजी आमदार श्री. रामकृष्ण मडावी यांनी सांगितले. ते सार्वजनिक बांधकाम विभाग आरमोरी येथील विश्राम गृहात पत्रकार परिषद मध्ये बोलत होते.

प्रामुख्याने या जिल्हा नियोजन समिती मध्ये किसन नागदेवे, बाबुराव कोहळे, प्रकाश पोरेड्डीवार, रवींद्र ओल्लालवार, प्रशांत वाघरे,गोविंदाजी सारडा, प्रमोद पीपरे, योगिता भांडेकर, कलाम पीर मोहम्मद, सदानंद कुथे, सुनील विश्वास अशी आहे. यात महत्वाचे म्हणजे अकरा सदस्यांच्या समितीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती चे सदस्य असणे आवश्यक असतांना सुद्धा सर्व नियम धाब्यावर बसवून जिल्ह्यातील कार्यकारिणीत ज्यांच्याकडे अधिक काही महत्वाचे पद असलेल्यानाच व यातील काही प्रमुख क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण पद काबीज केली आहेत अशांनाच स्थान देऊन या समिती मध्ये समाविष्ट करण्यात आले. महत्वाचे म्हणजे या समितीतील सदस्य हा त्या जिल्ह्यातील मतदार संघाचा मतदार असायला पाहिजे. तसेच या समिती मध्ये विरोधी पक्षातील एक सदस्य असायला पाहिजे. मात्र दुसऱ्यांना स्थान न देता सर्व अटी व नियमाला बाजूला ठेऊन ही समिती तयार करण्यात आली आल्याने ही जिल्हा नियोजन समिती पक्षपाती असून पालक मंत्र्यांनी थोपवलेली समिती असल्याचे आक्षेप माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की जिल्हा नियोजन समितीच्या एकूण 11 सदस्या पैकी 6 सदस्य ही अल्प संख्यांक जाती वर्ग गटातील असून जाणीवपूर्वक पूर्वक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीला डावलण्यात आले. या समितीच्या माध्यमातून आपल्या पक्षातील लोकांनाच पद दिली जात असल्याचा कट कारस्थान भारतीय जनता पार्टी कडून केला जात आहे. ही समिती नियमाला बगल देऊन करण्यात आलेली समिती असून याचा जनतेने सुद्धा निषेध करीत पालक मंत्र्याना जनतेनी काळी झेंडी दाखवायला पाहिजे असेही माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here