Home आरमोरी दंडार कलावंत सोमनाथ मानकर यांचा सत्कार 

दंडार कलावंत सोमनाथ मानकर यांचा सत्कार 

0
40

 

 

आरमोरीः- तालुक्यातील चुरमुरा येथे नवयुवक नाट्य कला मंडळाच्या वतीने मंडई निमित्य आयोजीत सासुच्या घरात सुनबाई जोरात या नाटकात दंडारीत स्त्री कलावंताची भूमिका साकारणाऱ्या सोमनाथ मानकर यांचा नाट्य मंडळाच्या वतीने आमदार रामदास मसराम व काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आला.

 

ग्रामीण संस्कृतीची ओळख म्हणून दंडारीकडे पाहिले जाते चुरमुरा येथील सोमनाथ मानकर हे गेल्या कित्येक वर्षापासून दंडार कलावंत म्हणून काम करीत असून त्यांनी अनेक दंडारीत स्त्री पात्राची भूमिका साकारून आपल्या कलेची चुणूक दाखवीत असतात. त्यामुळे मंडळांनी त्यांच्या जाहीर सत्कार केला

कार्यक्रमाला माजी प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे, वामनराव सावसागडे, मिलिंद खोब्रागडे, कवडू सहारे, माजी सरपंच मुखरू देशमुख, पोलीस पाटील सतीश जांपलवार, भूपेश कोलते, जावेद शेख, ईश्वर रोहनकर ,राजू सामृतवार,, भूषण रोहनकर व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन विजयकुमार शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन मुखरु देशमुख यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here