Home आरमोरी *भारतीय बौध्द महासभा शाखा आरमोरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी...

*भारतीय बौध्द महासभा शाखा आरमोरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी यांच्या वतीने पंजाब येथील अम्रतसर घटनेचा केला जाहीर निषेध

0
42

आरमोरी ः- 26 जानेवारी 2025 ला भारत देशात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पंजाब येथील अम्रतसर येथील मुख्य चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची हातोडे मारून विटंबना केली.घटनेच्या प्रतीक्रती ची सुध्दा विटंबना केली. या घटनेचा निषेध भारतीय बौद्ध महासभा, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी च्या वतीने तहसील कार्यालय आरमोरी येथे करून मा.तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी म्हणून निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करताना मंडळाचे अध्यक्ष यशवंत जांभुळकर, उपाध्यक्ष रमेश सोरदे, दिवाकर रामटेके, ताराचंद बन्सोड, प्रदिप रोडगे, मुरलीधर भानारकर,के.डी.तुबंडे,वसंत इंदूरकर,एम.एन.सुखदेवे, भारती मेश्राम, कल्पना ठवरे,वर्षा खोब्रागडे, सुलभा बोरकर, अनुराधा रामटेके, कुमता मेश्राम, भावना बारसागडे,गया जनबंधू, लता बारसागडे, दुर्गा मेश्राम, सुनीता तागवान इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here