Home आरमोरी आरमोरीत प्रकाश चषक क्रिकेट स्पर्धेच्या शानदार सोहळ्याचे उद्घाटन

आरमोरीत प्रकाश चषक क्रिकेट स्पर्धेच्या शानदार सोहळ्याचे उद्घाटन

0
30

पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंत टिकतात परंतु कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात…

ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार

 

 

आरमोरी…

पैशाने पुर्ण झालेली स्वप्न ही मरेपर्यंत टिकतात परंतु कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न हे इतिहास घडवतात. सचिन तेंडुलकर ,सुनील गावस्कर सारखे महान खेळाडूं कष्टाने मोठें झाले पण त्यानी मुंबईसह देशाचेही नावं मोठं केलं. एवढी ताकद खेळामध्ये आहे.खेळामध्ये हार जित होत राहते माञ हरनारा मानूस हा कधीच कायमस्वरूपी हरत नसतो. तर तो पुन्हा जिद्दीने प्रयत्न करुन अंतीम ध्येयापर्यंत पोहचतो. आणि जिवनात परीवर्तन घडवितो. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळावी या हेतूने सुरू करण्यात आलेल्या प्रकाश चषकाची व्याप्ती आता गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे ते विदर्भातही पसरली आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील, राज्याबाहेरील अनेक नामांकित टीमा या चषकात सहभागी होऊन खेळत आहेत त्यामुळे आरमोरीचे नाव अभिमानाने घेतले जाते ही प्रकाश चषकाची फलश्रुती आहे.प्रकाश चषक हे आरमोरीकरासाठी पर्वणी असुन आहेः . भविष्यात जिल्ह्याच्या इतिहासात प्रकाश चषकाचे नाव कोरले जाईल असा आशावाद सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी केले .

 

युवा मंच ,प्रकाश चषक आयोजन समिती आणि मॉर्निंग क्रिकेट ग्रुप यांच्या संयुक्त वतीने आरमोरी येथील हितकारिणी कॉलेजच्या ग्राउंडवर प्रकाश चषक भव्य टेनिस बॉल रात्र कालीन क्रिकेट स्पर्धाच्या दिमाकदार सोहळ्याचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी पार पडले. यावेळी ते बोलत होते.

 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णा गजबे हे होते स्पर्धेचे दीप प्रज्वलन गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार ,भाग्यवान खोब्रागडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, पोलीस निरीक्षक कैलास गवते ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ईश्वर पासेवार, श्रीहरी कोपुलवार,डॉ. अमोल धात्रक डॉ. नीलकंठ मसराम, अशोक ठकरानी, नंदू पेट्टेवार, सदानंद कुथे ,माणिक भोयर आदी उपस्थित होते

 

प्रकाश चषक पर्व ३ हे आरमोरी करासाठी एक मेजवानी असून आरमोरी शहराला क्रीडा नगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या तीन वर्षापासून आरमोरी शहरात प्रकाश चषकाचे आयोजन केले जात आहे यावर्षी सुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई, लेझर लाईटच्या झगमटात नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार कृष्णा गजबे यांनी प्रकाश चषकातून तरुणांना खेळण्याची संधी मिळत असून त्यांना ऊर्जा प्रदान करण्याचे काम केले जात आहे. आरमोरी भूमीतून अनेक खेळाडूं तयार होऊन त्यानी राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करीत असल्याने क्रीडा क्षेत्रात आरमोरीचे नाव अभिमानाने घेतले जाईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार व शिक्षण महर्षी भाग्यवान खोब्रागडे यांनीही संबोधित केले

 

प्रास्ताविक भारत बावनथडे यांनी केले.संचालन अक्षय हेमके यांनी तर आभारप्रदर्शन विलास पारधी यांनी केले

 

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा झाला सत्कार…

प्रकाश चषकाच्या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल धात्रक डॉ. नीलकंठ मसराम ,अमर बोबाटे गोलू वाघरे, प्रसाद साळवे श्रीकांत नागीलवार सागर नाकाडे हैदरभाई पंजवानी ,रोहित कोहाडे कुणाल देशमुख नेता हेमंत कोपुलवार केतन घोसे ,पवन कोकोडे ,अतुल नखाते अजय कुथे,आदी विविध मान्यवरांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

 

प्रकाश चषकाच्या यशस्वी आयोजनासाठी पवन नारनवरे, पंकज खरवडे , विलास पारधी, अक्षय हेमके,नंदू नाकतोडे, भारत बावनथडे, कुणाल पिल्लारे , स्वप्निल कारकुरवार, मुकुल खेवले , गोविंदा भोयर प्रसाद साळवे, सुरज कारकूरवर, शुभम निंबेकर, मनोज मने सह अनेकांनी यशस्वी प्रयत्न केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here