आरमोरी….
आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत आरमोरी तालुक्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या शासकीय हमी भावाच्या धान खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांकडून निकृष्ट बारदाण्याचे वितरण करण्यात येत असल्याचे धान साठवणूक करण्यास अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
हमी भावाच्या धान खरेदी केंद्रावर पुरवण्यात येत असलेल्या बारदाना हा 30 ते 40 टक्के निकृष्ट दर्जाचा असून त्या बारदाण्यामध्ये धान्य साठवणूक करण्यास अडचणी येत आहेत.त्यामुळे चांगल्या प्रतीचा बारदाना व्यापाऱ्याकडून स्वीकारण्यात यावा.आणि जे व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाचा फटका तुटका बारदाना पुरवठा करीत आहेत अश्या व्यापाऱ्यांचे बिल देण्यात येऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे…
यासंदर्भात माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून यासंधर्भात विचारणा करून चांगल्या प्रतीचा बरदाना पुरविण्याच्या सूचना केल्या.


