Home आरमोरी श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज आरमोरी येथील द्वितीय वर्षाचा निकाल ८८.८८%...

श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज आरमोरी येथील द्वितीय वर्षाचा निकाल ८८.८८% टक्के

0
35

 

आरमोरी…. श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज आरमोरी येथील द्वितीय वर्ष्याच्या विद्यार्थ्यांनी ऑक्टोंबर २०२४ ला परीक्षा दिली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग आणि पॅरामेडीकॅल एज्युकेशन मुंबई यांनी दिनांक डिसेंबरला निकाल जाहीर केला, या मध्ये श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज आरमोरीचा निकाल ८८.८८% टक्के लागला व सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

एकूण ३६ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या मध्ये ६ विद्यार्थ्यांनी डीस्टीक्शन प्राप्त केले, तसेच १७ विद्यार्थ्यांथी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

प्रथम क्रमाक कु. स्वाती संतोष सेलोटे, हिने ८४.७१ टक्के गुण प्राप्त केले, तसेच द्वितीय क्रमांक कु. योगिता नानाजी बगमारे हिने ८३.४२ टक्के गुण तर तृतीय क्रमांक कु. दिपाली नानाजी करांकर हिने ८२.४२ टक्के गुण प्राप्त केले. यामध्ये एकूण ६ विद्यार्थी डीस्टीक्शन मध्ये आले त्यामध्ये स्वाती सेलोटे, योगिता बगमारे, दिपाली करंकर, निशिगंधा औत्तकर, चांदनी गोंगले, अचल मंडलवार यांचा समावेश आहेत.

सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आणि मेडिकल सायन्स वाकडीचे अध्यक्ष व श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज आरमोरीचे कॉलेज संचालक, सुधाकर साळवे यांनी कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय कॉलेजचे संचालक सुधाकर साळवे, प्राचार्या पूनम नारनवरे , मृणाल दर्वे , पल्लवी कोथळकर , संगम मेश्राम , चंदू दुमाने , करिष्मा हांडे , मोनाली सडमेक , समीर कांबळे व कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी भूषण ठकार ,, चंदा गुरनुले , यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here