Home आरमोरी मुलगा नसलेल्या वडिलांना चार मुलींनीच खांदा देत केले अंत्यसंस्कार, मुलगा-मुलगी भेद करणाऱ्यांना...

मुलगा नसलेल्या वडिलांना चार मुलींनीच खांदा देत केले अंत्यसंस्कार, मुलगा-मुलगी भेद करणाऱ्यांना दिली चपराक

0
28

 

 

आजाराने मरण पावलेल्या सभासदांच्या अत्यविधी साठी श्री गुरुदेव जंकासंस्थाच्या वतीने आर्थिक मदत करुण आपुलकी जपली 

 

मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणाऱ्यांना एक चपराक देणारी घटना चिखली गावात घडली आहे. मुलगा नसलेल्या वडिलांना मुलींनेच खांदा दिला आणि त्यानंतर वडिलांना माती सुद्धा दिली.

 

जोगीसाखरा – मुलगी हे परक्याचे धन समजले जात असल्याने दुय्यम वागणूक दिली जाते. मात्र देसाईगंज तालुक्यातील चिखली रीठ येथील बाबुराव मडावी यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या चार मुली पुढे सरसावल्या. त्यांनी मृतदेहाच्या तिरडीला खांदा देत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले आहेत. मुलींनी आपल्या आईचाही सांभाळ करण्याची शपथ अंत्यसंस्कारप्रसंगी घेतली. त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. आजही जन्मदात्या वडिलांच्या पार्थिवाला मुलानेच खांदा देण्याची भारतात प्रथा आहे. मात्र या प्रथेला छेद देणारी घटना देसाईगंज तालुक्यातील चिखली गावात घडली.

 

देसाईगंज तालुक्यातील चिखली रीठ येथील रहिवासी बाबुराव आणि सौ. केमाबाई याचा सर्वसाधारण परिवार. काबाडकष्ट करणाऱ्या बाबुराव यांनी उत्तरा अनुताई ललीता आणि निराशा या चार मुलींना मोठं करून शिक्षण व संगोपण केले. एका एकर जबरान शेती कसिबसुन चारही मुलीचे लग्न केले.परतु कष्ट झेपत नसल्याने पण ८० पार केलेल्या आपल्या वडील व आईचा सांभाळ या चारही मुली करीत होत्या.  गेल्या एक वर्षापासून आजारी वडीलांची अत्यंत गरीब परिस्थिती अशाच परिस्थितीत चार मुलीच्या लग्नाचा कर्जाचा बोजा देतादेता पुणता दिवाळा उडत असताना घराची संपूर्ण जबाबदारी आता या चारही मुलींच्याच खांद्यावर होती. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या परिवारावर काळाने घाला घातला आणि वयाच्या ८० व्या वर्षी उत्तरा अनुताई ललीता आणि निराशा यांचे वडील बाबूराव यांचे आजारपणामुळे अचानक काल निधन झाले. परिस्थिती हलाकीची असताना सुद्धा वडिलांनी कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता पडू न देता चारही मुलींचा सांभाळ केला. त्यांच्या निधनानंतर अखेर मुलींनी तिरडीला खांदा देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेऊन चारही मुलीनी चारबाजुनी वडीलांची तिरडी धरुन मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, अंत्यसंस्काराचे दृश्य पाहून लोकांच्याही डोळ्यात अश्रू या घटनेनं मुलगा, मुलगी असा भेद करणाऱ्यांना या घटनेनं सणसणीत प्रतिउत्तर मिळाले आहे असं म्हणायला हरकत नाही.

याची माहिती होताच सर्व प्रथम श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थांच्या वतीने मृतक बाबुराव मडावी चिखली रीठ हे श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा येथील सभासद असलेने संस्थेचे पदाधिकारी धाऊन जाऊन सेवाभावाची जान ठेऊन त्याच्या परीवारावर डोंगरच कोसळले असल्यामुळे सामाजिक दायित्वाच्या दृष्टीने सभासद व कृटुबाच्या सुख दुखात श्री गुरुदेव जंगल कामगार संस्था सहभागी होऊन श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या हस्ते सस्थेच्या वतीने अत्यविधी साठी मदत मृतकाच्या पत्नी मुलीकडे देऊन आपली माणुसकी जपली यावेळी उपाध्यक्ष शेषराव कुमरे सचिव गिरीधर नेवारे संचालक धर्मराज मरापा गोपाल खरकाटे दिवाकर राऊत उपस्थित होते श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था ही अडचणीत सापडलेल्या प्रत्येक सभासदाच्या सुख दुःखात सहभागी होऊन विविध मार्गाने मदत करण्यास कटिबद्ध राहुन सभासदांना व त्यांच्या कुटुंबीयांना संस्थेनी वेळेवर आथिर्क मदत केल्याने लाख मोलाची ठरत असल्यामुळे श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे जनमानसानी कैतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here