Home आरमोरी इयत्ता 10 नंतरच विद्यार्थ्यांच्या जिवनाची खरी परीक्षा सुरू. विद्यार्थ्यांनी जिद्द कायम ठेवावी……

इयत्ता 10 नंतरच विद्यार्थ्यांच्या जिवनाची खरी परीक्षा सुरू. विद्यार्थ्यांनी जिद्द कायम ठेवावी……

0
27

 

आरमोरी ….

 

शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, गडचिरोली, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली व सारथी विभागीय कार्यालय यांचे संयुक्त विध्यमाने आयोजित जिल्हास्तरीय एक दिवसीय करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरात उदघाटक म्हणून मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोजभाऊ वनमाळी यांचे प्रतिपादन…..

” इयत्ता 10 वि चे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या जिवनाची खरी परीक्षा इथूनच सुरू होते. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी खूप मेहनत, नियमित अभ्यास, जिद्द, चिकाटी व योग्य मार्गदर्शन घेऊन भरघोष यश मिळवावे व योग्य करिअर निवडून जीवनात यशस्वी व्हावे.” असे प्रतिपादन आज महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी येथे शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, गडचिरोली, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली व सारथी विभागीय कार्यालय यांचे संयुक्त विध्यमाने आयोजित जिल्हास्तरीय एक दिवसीय करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरात उदघाटक म्हणून मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोजभाऊ वनमाळी यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरसिंगदीप गेडाम, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनित मते, वरिष्ठ अधिव्याख्याता डायट गडचिरोली, पुनीत मातकर अधिव्याख्याता तथा जिल्हा समनव्यक गडचिरोली, प्रभाकर साखरे, जिल्हा समुपदेशक डायट गडचिरोली हे होते. सर्वांनी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार, कौशल्याचा विकास, नव्या दिशाचे मार्गदर्शन केलेत. प्रमुख अतिथी प्राचार्य साईनाथ अद्दलवार, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डोर्लीकर सर हे होते.

कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक शाळांतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभागी झालेत. प्रास्तवीक प्राचार्य साईनाथ अद्दलवार, संचालन दीपक गोंडाने तर आभार प्रदर्शन हेमंत निखारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here