वेणूताई ढवगाये, दिवाकर पोटफोडे व नागरिकांची तहसिलदार यांच्याकडे मागणी….
*आरमोरी….स्थानिक इंदिरानगर बर्डी येथील रहिवाशाचे मकानासह खुल्या जागेचे भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजमाप करून आखीव पत्रिका देण्यात याव्यात अशी मागणी माजी जिल्हा परिषद सभापती वेणूताई ढवगाये व दिवाकर पोटफोडे यांच्या नेतृत्वात इंदिरानगर बर्डी येथील नागरिकांनी तहसिलदार यांचेकडे केली आहे.
आरमोरी शहरातील इंदिरानगर बर्डी येथे मोठ्या प्रमाणावर घराची वस्ती आहे. मात्र नागरिकाच्या घरासह खुल्या जागेची मोजणी झाली नसल्याने आखीव पत्रिका तयार झाल्या नाही. या भागात अनेक गरीब कुटुंब असून त्यांना घरकुलाची गरज आहे. आखिव पत्रिका अभावी गरीब कुटुंबातील लाभार्थी घरकुल पासुन वंचित आहेत.. त्यामुळे इंदिरानगर बर्डी येथिल गावठाण घराचे व खुल्या जागेचे भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजमाप करून आखीव पत्रिका देण्यात याव्यात व गरजूंना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सभापती वेणूताई ढवगाये व दिवाकर पोटफोडे यांच्या नेतृत्त्वात नागरिकांनी तहसिलदार ललितकुमार लाडे यांची भेट घेऊन व चर्चा करून निवेदनातून मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी रमेश भोयर ,पल्लवी मानकर, नाशिका तितीरमारे, मंदा तितीरमारे ,रोशनी पडवार, पूजा गेडाम पौर्णिमा टेंभुर्णे, करीना गराडे, गौरी मेश्राम, रेणुका सपाटे ,निर्मला शेंडे, निर्मला दोडके, तारा ठवकर, उत्तरा शेंडे, जया धारणे, आशा नारनवरे, चंद्रप्रभा दुमाने ,आशा मेश्राम, पिंगला पंडेलगित, दर्शना चौके, कविता पोवनकर , आदी उपस्थित होते


