आढावा बैठकीत ॲड. कविता मोहरकर यांच्या सुचना
देसाईगंज-
देशात सद्या स्थितीत अराजकतेचे वातावरण निर्माण झाले असुन सर्वच स्तरातील लोकं स्वतःला असुरक्षित मानु लागले आहेत. यात महिलांची प्रचंड मुस्कटदाबी होत असली तरी महिलांचा असंघटित पणा यास जबाबदार असुन महिलांचे अधिकार काँग्रेसच अबाधित राखु शकते असा ज्या महिलांचा विश्वास झाला आहे त्या काँग्रेस पक्षाशी जुळवून घेऊ लागल्या आहेत.त्या अनुषंगाने पक्ष वाढीसाठी काँग्रेसी विचारधारेच्या महिलांनी एकजुटीने काम करण्याच्या सुचना गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा ॲड.कविता मोहरकर यांनी देसाईगंज येथील विश्रामगृहात आयोजीत पक्षाच्या महिलांच्या आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी
वाढलेल्या प्रचंड महागाईत सर्व सामान्य गोरगरीब होरपळून निघत असुन घर सांभाळणाऱ्या गृहिणींना यांची चांगलीच जाणीव होऊ लागली आहे.अशात ही स्थिती पुर्ववत आणण्यात काँग्रेसच सक्षम असल्याची विचारधारा असलेल्या असंख्य महिला पक्षाची विचारधारा समजुन घेऊन काँग्रेसचा झेंडा हाती घेऊ लागल्या आहेत.माञ गटागटात विखुरल्या असल्याने नारी शक्ती कमी पडु लागल्याचे दिसुन येत असल्याने महिलांच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

