Home Breaking News झेंडेपार अवैध लोहखनिज उत्खननप्रकरणी २६ दिवसांनंतर गुन्हा

झेंडेपार अवैध लोहखनिज उत्खननप्रकरणी २६ दिवसांनंतर गुन्हा

0
53

 

 

गडचिरोली : कोरची तालुक्यातील झेंडेपार येथील डोंगरातून लोहखनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्या ‘अजंता मिनरल्स’वर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होऊन २६ दिवस उलटल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली. १२ जानेवारीला कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या स्थानिक साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

झेंडेपार येथील सर्व्हे क्रमांक ८२ मध्ये १७ डिसेंबरच्या रात्री अजंता मिनरल्सचा मॅनेजर आणि बेतकाठी येथील लालसाय सरपा यांनी ९ मजुरांच्या मदतीने लोहखनिजाची चोरी सुरू केली होती. साधारण १ लाख रुपये किमतीचे अर्धा ब्रास खनिज ट्रॅक्टरमध्ये भरले जात असताना स्थानिक ग्रामस्थांनी हा प्रकार पकडून दिला होता. त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. या चोरीचे वृत्त सविस्तरपणे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाईवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. १८ डिसेंबर रोजीच तहसीलदारांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्खननामागे ‘अजंता मिनरल्स’चा थेट हात असल्याचा स्पष्ट अहवाल दिला होता. असे असतानाही गुन्हा नोंदवण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी का लागला, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

प्रकरण दडपण्याचे प्रयत्न

महसूलमधील एका वादग्रस्त अधिकाऱ्याने हे प्रकरण दडपण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. संबंधितांना वाचवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मोठी ‘फिल्डिंग’ लावण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट हस्तक्षेप केल्याने या अधिकाऱ्याचे मनसुबे धुळीस मिळाले आणि अखेर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here