Home Breaking News ‘अभाविप’ म्हणजे देशहित जपणारी, नेतृत्व घडवणारी शाळा -आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक...

‘अभाविप’ म्हणजे देशहित जपणारी, नेतृत्व घडवणारी शाळा -आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

0
30

 

गडचिरोली येथे अभाविपचे ५४ वे विदर्भ प्रांत अधिवेशन उत्साहात

गडचिरोली : “देशाला प्रथम स्थानी ठेवून राष्ट्राचे यशस्वी नेतृत्व करणारी पिढी निर्माण करणारी शाळा म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद होय. विद्यार्थ्यांनी अभाविपचे देशभक्तीचे संस्कार आत्मसात करून देशासाठी कार्य करावे,” असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. अशोक उईके यांनी केले.

गडचिरोली येथे आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) ५४ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री वीरेंद्रसिंह सोलंकी उपस्थित होते. आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गोविंद सारडा, डॉ. श्रीकांत पर्बत, देवशिष गोतकर आणि नगर मंत्री संगीत मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अशोक नेते (माजी खासदार व राष्ट्रीय महामंत्री, भाजपा एस.टी. मोर्चा), रमेश बारसागडे (भाजपा जिल्हा अध्यक्ष), प्रणोती निंबोरकर (नगराध्यक्ष), माजी आमदार डॉ. देवराव होळी, डॉ. नामदेव उसेंडी, प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम, अनिल कुणघाडकर, दत्तुभाऊ सुत्रपवार, योगीता पिपरे, प्रमोद पिपरे आणि रमेश भुरसे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भातील विद्यार्थी शक्तीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

अधिवेशनादरम्यान वक्त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना जोपासणे आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करून भविष्यातील नेतृत्वाची जडणघडण करणे, यावर भर दिला. गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात अशा मोठ्या अधिवेशनाचे आयोजन झाल्याने स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here