Home Breaking News शाश्वत खाणकामात ‘लॉयड्स मेटल्स’ची भरारी ! ; ‘सुरजागड खाणी’ला राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित...

शाश्वत खाणकामात ‘लॉयड्स मेटल्स’ची भरारी ! ; ‘सुरजागड खाणी’ला राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कार

0
33

 

३६ व्या MEMC सप्ताहात नागपुरात गौरव; कंपनीच्या ‘महिला टीम’ने स्वीकारला सन्मान

नागपूर : पर्यावरण संरक्षण आणि खनिज संवर्धनाच्या
क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खाण उद्योगांचा गौरव करण्यासाठी नागपूर येथील हॉटेल रीजेंटा येथे ३६ व्या ‘मायन्स एन्व्हायर्नमेंट अँड मिनरल कन्झर्व्हेशन’ (MEMC) सप्ताहाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. या प्रतिष्ठित सोहळ्यात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) च्या सुरजागड लोहखनिज खाणीने आपल्या शाश्वत कार्यपद्धतीचा ठसा उमटवत राष्ट्रीय स्तरावर द्वितीय पुरस्कार पटकावला.

भारतीय खान ब्युरो (IBM) च्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात, ‘फुली-मेकनाइज्ड ओपन कास्ट माइन्स’ या अत्यंत आव्हानात्मक श्रेणीत लॉयड्स मेटल्सला हा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे, अल्ट्राटेक सिमेंटच्या नाओकारी लाइमस्टोन माइन्ससोबत लॉयड्सने हा संयुक्त पुरस्कार विभागून घेतला.

या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे लॉयड्स मेटल्सच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेली ‘महिला टीम’. खाण क्षेत्रासारख्या कठीण समजल्या जाणाऱ्या उद्योगात महिलांच्या समावेशक सहभागाची ही दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. या महिला कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत आपल्या व्यावसायिक अनुभवांचे सादरीकरण केले, ज्याचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक झाले.

कार्यक्रमादरम्यान लॉयड्स मेटल्सने आपल्या शाश्वत उपक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने ग्रीन माइनिंग: पर्यावरणाचा समतोल राखणारी खाणकाम पद्धत. तांत्रिक प्रगतीः स्लरी पाइपलाईन प्रकल्प, पेलेट प्लांट संचालन आणि BHQ चे बेनिफिशिएशन. सामाजिक उत्तरदायित्वः गडचिरोली जिल्ह्यासह परिसरातील प्रभावी CSR उपक्रम. यांचा समावेश

“हरित भविष्यासाठी आमची बांधिलकी” – श्री. बी. प्रभाकरन

या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले, “हरित, स्वच्छ आणि शाश्वत खाणकामाच्या आमच्या दृष्टीकोनाला या पुरस्कारामुळे बळ मिळाले आहे. विशेषतः राष्ट्रीय पातळीवर कंपनीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या महिला कर्मचाऱ्यांचा मला अभिमान आहे. महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण रक्षण ही आमची निरंतर बांधिलकी आहे.”

या कार्यक्रमाला भारतीय खान ब्युरोचे अधिकारी, खाण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LMEL च्या सुरजागड आयर्न ओअर माइन्सला मिळालेले पुरस्कार

वरील सन्मानाव्यतिरिक्त, ३६व्या MEMC सप्ताहात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सुरजागड आयर्न ओअर माइन्सने विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी कमी दर्जाच्या खनिजांचे बेनिफिशिएशन व उपयोगः प्रथम पुरस्कार, वनीकरणः प्रथम पुरस्कार, शाश्वत विकासः द्वितीय पुरस्कार, पद्धतशीर व शास्त्रीय विकासः तृतीय पुरस्कार, एकूण कामगिरी (ओव्हरऑल): द्वितीय पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्राप्त केले आहेत.

हे सर्व पुरस्कार शाश्वत खाणकाम पद्धती, पर्यावरण संरक्षण आणि जबाबदार संसाधन व्यवस्थापनात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा पुष्टी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here