Home आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयाला मिळाली नविन इमारत….. शुक्रवारी झाले लोकार्पण 

वनपरिक्षेत्र कार्यालयाला मिळाली नविन इमारत….. शुक्रवारी झाले लोकार्पण 

0
26

 

आरमोरी:-आरमोरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) यांचे कार्यालयालयाची कौलारू जूनी इमारत काही वर्षांपासून जिर्ण अवस्थेत आली होती.त्यामुळे कामकाजाच्या दृष्टीने वनपरिक्षेत्र कार्यालयाकरिता नविन इमारत कॅम्पा योजनेत मंजूर करून सदर इमारतीचे बांधकाम सन २०२३.२४ या वर्षात पूर्ण करण्यात आले. या इमारतीचे लोकार्पण गुरूवारी आ.क्रिष्णा गजबे, यांच्या हस्ते करण्यात आले

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन भारतीय वन सेवेतील अधिकारी पवनकुमार जोंग , आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, वडसाचे सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण, नगरपरिषदेचे सभापती भारत बावनथडे, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे ,नंदु पेट्टेवार, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वडसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, देलनवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मेहर , कंत्राटदार नितीन राऊत, उपस्थित होते.

 

प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांनी केले.संचालन वनरक्षक आनंद साखरे यांनी तर आभार प्रदर्शन वनरक्षक पि. आर. पाटिल यांनी केले. लोकार्पण सोहळ्याला वन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जंगली हत्तींच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबीयाला २५ लाखाचा धनादेश प्रदान

——————————————

तालुक्यातील शंकरनगर येथील कौशल्याबाई राधाकांत मंडल या आपल्या शेतातील घरात झोपल्या असताना सदर महिलेवर वन्यप्राणी हत्तीने २९ डिसेंबर २०२३ रोजीआरमोरी रात्रौ हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना वनविभागाच्या वतीने आ.क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते २५ लाख रुपये मदतीचा धनादेश यावेळी प्रदान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here