स्वराज्य सप्ताह व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आरमोरी येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अमीन लालानी, तालुका कार्यकारी अध्यक्ष सुनील नंदनवार, शहर उपाध्यक्ष प्रफुल राचमलवार, महिला तालुका अध्यक्षा वृषलिताई भोयर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे आरमोरी विधानसभा अध्यक्ष अनुज शंकरराव घोसे, युवक तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, युवक तालुका सरचिटणीस उमेश दुमाने, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष संतोष भोयर,युवक शहर अध्यक्ष आशुतोष भरणे,अमित जुआरे, तेजस नवघरे,यश नेऊलकर,वैभव सेलोकर,निहाल लोणारे,आयुष मेश्राम,बन्नी बांगरे,अनुज निंबेकर, अंकुल मानकर,पवन कुकडकर, जयश्री भोयर, इंदिरा हूड, आणि शिवाजी चौक परिसरातील नागरिक उपस्थीत होते.


