:- येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नंदू गोबाडे सर,प्रमुख अतिथी सोनूले सर,गजबिये मॅडम,हटवार सर,मेश्राम सर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून
माल्यार्पन करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक गोबाडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर, सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालून आपली प्रगती करून घ्यावे असे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक वृद व शालेय मंत्रिमंडळातील सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.


