Home कोरची टाहकाटोला येथे जि.प. शाळेत शिक्षण परिषद मेळावा व निरोप समारंभ

टाहकाटोला येथे जि.प. शाळेत शिक्षण परिषद मेळावा व निरोप समारंभ

0
29

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाहकाटोला येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद, मेळावा व निरोप तथा सत्कार समारंभ दिनांक २१/०४/२०२३ रोज शुक्रवारला पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद कावडकर सर केंद्र प्रमुख केंद्र- देऊळभट्टी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वाय. आर. टेंभुर्णे गटशिक्षणाधिकारी पं. स. कोरची, मंदा आवारी मॅडम केंद्र प्रमुख केंद्र-बेडगाव, किशोर हीळको, शाळा व्यवस्थापन समिती, टाहकाटोला, ओमकार ठलाल सर, प्रमोद वाढणकर सर, लिंगायत सर, मनोहर परशुरामकर सर, आदी उपस्थित होते.
प्रथम टाहकाटोला शाळेच्या विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर केला नंतर लगेच सूचिता करंबे मॅडम व स्वाती दहीकर मॅडम यांनी प्रोजेक्टरवर मार्गदर्शन करून शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित कसा करावा ते प्रत्यक्ष कृती द्वारे स्पष्ट केले. त्यानंतर लगेच सत्कार मूर्तीं दूर्वाज खुणे सर, चंद्ररेखा गजभिये मॅडम, सोनाली सोरते मॅडम, पूनम लंजे मॅडम यांना शाल श्रीफळ आणि भेट वस्तू देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदा आवारी मॅडम केंद्र प्रमुख केंद्र- बेळगाव यांनी केले. संचालन प्रकाश चिलबुले सर तर आभार प्रदर्शन गौरव कावळे सर मुख्याध्यापक टाहकाटोला यांनी केले, यानंतर सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व प्रमुख अतिथीचे भोजन झाले व नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here