Home कोरची कोटगुल येथील डॉक्टरावर सुरीने वार; वेडीच नागरिकांनी सोडवले जीवे मारण्याचा केला प्रयत्न

कोटगुल येथील डॉक्टरावर सुरीने वार; वेडीच नागरिकांनी सोडवले जीवे मारण्याचा केला प्रयत्न

0
31

डॉक्टर गंभीर जखमी प्राथमिक उपचार देऊन गडचिरोली रेफर

कोरची
कोरची तालुक्यातील कोटगुल येथील एका खाजगी डॉक्टरावर सोनपूर येथील एका इसमाने सकाळी १०:३० वाजता सुमारास सुरीने हल्ला केला. डॉक्टर गंभीर जखमी झाला असून सध्या गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की, डॉक्टर संजय बिस्वास हे गोडबोले ते खाजगी दवाखान्यात लोकांचे उपचार करतात. घटनेच्या वेळी आज मिथुन तांबेकर यांच्या किराणा दुकानांमध्ये ते बसून होते. सोनपूर येथील मारेकरी (आरोपी) मानक काटेंगे (४६) हे किराणा दुकानात येऊन मागून अचानक डॉक्टर संजय बिस्वास यांच्यावर सुरीने दोन वेळा पाठीवर तर एकदा मानेवर वार केला. यावेळी घटनास्थळी खूप जास्त रक्तस्त्राव झाले.
मानक काटेंगे हा डॉक्टरला सुरीने मारतांना बघून बाजूचे लोकांनी धाव घेऊन अडविण्याचे प्रयत्न केले परंतु मानक सोडायला तयार नव्हता त्यानंतर नागरिकांनी दोन-तीन हात कानशिलात लावून त्याला बाजूला केला. यानंतर कोटगुलच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी डॉक्टरला तात्काळ नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरीश टेकाम व त्यांच्या चमूने प्राथमिक उपचार केला परंतु माणेवरची जखमेच रक्तस्त्राव थांबत नसल्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय हलवण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली परंतु प्रकृति चिंताजनक असल्याने ज़ख़मी डॉ संजय बिस्वास यांना गडचीरोलीवरुण नागपूरच्या दवाखान्यात रेफर केले असल्याची माहिती मिळाली आहे.
नेमकं मारण्याचे काय कारण ते स्पष्टपणे कुणालाच कळू शकले नाही परंतु यांच्यात आंतरिक वाद असल्याचे लोकांकडून बोलले जात आहे. कोटगुल पोलिसांनी घटनास्थळावरून सुरी व आरोपीला ताब्यात घेतले असून आरोपी मानक काटेंगे याला सुद्धा दुखापत झाल्याने कोटगुल येथे प्राथमिक उपचार देऊन कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल केले याबाबाद अधिक तपास कोरची पोलीस निरीक्षक अमोल फडतरे करित असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here