कोरची
कोरची तालुक्यातील बेडगाव घाटावरून जड वाहनांची नेहमीच रात्र-दिवस वर्दळ सुरू राहतो अनेकदा घाटावर अनेक अपघात झाले असून कित्येकांचे जीव गेले आहे. बुधवारी रात्रो दरम्यान बेडगाव नऊ किमी घाटावरील वळणाच्या उतारावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बारा चक्का ट्रक ३० फूट दरीत कोसळले आहे. सुदैवाने ट्रक चालकला किरकोळ जखम झाली परंतु कुठल्याही प्रकारचे जीवित हानी झाली नाही.
एम एच ४० बी जी १७४९ क्रमांकाचे ट्रक हैद्राबादवरून मक्का बिजाई भरून रायपुरला निघाली होती मात्र रात्रोच्या दरम्यान बेडगाव घाटावरील पहिला चढाव चढल्यावर उतारावरील वळणावर वाहकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक ३० फूट दरीत जाऊन घुसली परंतु यावेळी समोरून कुठलेही वाहन येत नव्हते नाहीतर खूप मोठे अपघात झाले असते.
काही दिवसांपूर्वी याच घाटावर कंटेनरचे टिप्परला समोरासमोर धडक झाली होती या धडकेच्या मधात दुचाकीस्वार अडकले असून दोघे जण ठार तर एक गंभीर जखमी झाले होते. दरम्यान दिवसभर वाहतूक ठप्प झाले असून वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सदर मार्ग हे राष्ट्रीय महामार्ग आहे रायपुर – चंद्रपूर – हैद्राबाद ला जोडणारा मार्ग असून नेहमीच या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ सुरू राहतो.


