Home कोरची कोरची येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा प्रसिद्ध साहित्यिक, वक्ते ज्ञानेश वाकुडकर...

कोरची येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा प्रसिद्ध साहित्यिक, वक्ते ज्ञानेश वाकुडकर व जिंदा भगत उपस्थित राहणार

0
29

 

कोरची
बौद्ध समाज कोरचीच्या वतीने दिनांक 14 व 15 एप्रिल 2023 ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मौजा कोरची येथे भव्य समाज प्रबोधन मेळाव्याचे तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दिनांक 14 एप्रिल 2023 ला सकाळी दहा वाजता विविध ठिकाणी ध्वजारोहण, दुपारी बारा वाजता १) संविधान २) बहुजन महापुरुषांचे ३) धम्मक्रांती या विषयावर विविध बक्षिसासह युवकांची भाषण स्पर्धा व सायंकाळी पाच वाजता धम्म रॅली चे आयोजन केले आहे. तसेच दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी दुपारी एक वाजता भव्य समाज प्रबोधन मेळावा रात्रो नऊ वाजता अमोल राऊत युवा प्रबोधनकार यांचा बुद्ध, फुले, आंबेडकर आणि शिवरायांच्या जलसा व नृत्याची मेजवानी ‘उगवली पहाट निळ्या पाखरांची’ हा मनोरंजन पर आर्केस्ट्रा आयोजित आहे.
15 एप्रिल रोजी होणाऱ्या समाज प्रबोधन कार्यक्रमास प्रसिद्ध साहित्यिक कविवर्य ज्ञानेश वाकुडकर व सामाजिक विचारवंत वक्ते जिंदा भगत नागपूर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगर पंचायत कोरचीच्या नगराध्यक्ष हर्षलाताई भैसारे ह्या करणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य देवराव गजभिये व स्वागताध्यक्ष म्हणून कोरची शाखाध्यक्ष तुळशीराम अंबादे राहणार आहेत. सदर कार्यक्रमास तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याची विनंती बौद्ध समाज अध्यक्ष ज्योती भैसारे सचिव छाया साखरे व जयंती उत्सव समितीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here