Home कोरची कोरची तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडला. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. 

कोरची तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडला. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. 

0
31

 

कोरची.

कोरची तालुक्यात काल सायंकाळी ७ च्या सुमारास वादळ वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे उन्हाळी पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील चार ते पाच वर्षापासून शेतकरी

कोरची तालुक्यात उन्हाळी भातशेती मोठ्या प्रमाणात करु लागले आहेत. भाताचे पीक कापणीला आले आहे. परंतु मागील पंधरा दिवसापासून अधुनमधून पाउस पडतो आहे. तरीही काही शेतऱ्यांनी पीकाची कापणी केली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी शेतावरच धान्य वाळू टाकले आहेत. असे वाळू टाकलेले धान्य अचानक झालेल्या पाण्यात भिजले आहेत. तर ज्या शेतकऱ्यांचे धान्य कापणीला आले आहेत, ते धान्य पाण्यात बुडाल्या मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ज्या शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाला आहे अशा शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here