अतिदुर्ग भागातील ग्राहकांना दिवसभर टाळकळत बसून राहावे लागते बँकेत
कोरची
कोरची तालुका मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम कोटगुल येथील को-ऑपरेटिव्ह बँक शाखेतील मागील एक आठवड्यापासून लिंक फेल असल्यामुळे होळीच्या सणापुढे ग्राहकांना पैसा काढण्यासाठी व अन्य बँकेचे व्यवहार करण्यासाठी अडचणी निर्माण झाले आहे. अनेकदा या को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये लिंक फेल राहत असल्यामुळे नागरिकांना वेळेचा व पैशाचा भुर्दंड बसत आहे. घरातील, शेतीचे आणि अन्य कामे सोडून बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी अनेक ग्राहकांना दिवसभर टाळकळत बसून राहावे लागत आहे.
कोटगुल परिसरातील ३५ ते ४० गावे असून अतिदुर्गम भागातून २० ते ३० किमी अंतरावरून को-ऑपरेटिव बँकेत ग्राहक येत आहेत परंतु लिंक फेलचा अभावामुळे त्यांचा कुठलाच व्यवहार होत नसून ग्राहक त्रस्त झाले आहेत. अतिदुर्ग गोडबोले ते बँक सुरू झाल्यामुळे येथील नागरिक सुरुवातीला आनंदी झाले होते परंतु बँक सेवा नेहमीच कुचकामी ठरत असल्याने येथील नागरिकांचा मनस्ताप झालेला आहे. बँकेत सकाळपासून बसून राहिल्यानंतर दुपारी चार वाजता लिंक आली की एक तासासाठी लिंक राहून काही जणांचा विड्रॉल आणि व्यवहार होतो बाकी जणांना परतावे लागत आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी आले तर ग्राहकांना लिंक फेल चे सांगितले जात आहे.
अतिदुर्गम भागातील वयोवृद्ध लोकांना बँकेतील लिंक फेलमुळे खूप जास्त त्रास होत आहे बँकेचे बरेचदा चकरा मारून मारून ते थकले आहेत त्यामुळे त्यांना विविध शासकीय योजना पासून वंचितही राहावे लागत आहे. सध्या होळीचा सण पुढे आहे येथील व्यापाऱ्यांना पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी या बँकेतून व्यवहार करावे लागते परंतु लिंक फेल असल्यामुळे येथील व्यापाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसत आहे.
कोटगुल येथील शुक्रवारी आठवडी बाजार भरतो या बाजारात अतिदुर्गम गावातील अनेक नागरिक येतात आणि या बँकेमधून पैसे काढून आठवडी बाजार करतात परंतु लिंक फेल मुळे ग्राहकांचे पैसे निघत नाही आणि परिणामी काहीजण बाजारा न करताच तर काही अन्य कोणाला उधार मागून बाजार करावी लागत आहे. कोटगुल येथील को-ऑपरेटिव बँक शाखेची लिंक फेलची ही एकदाची समस्या नसून ही समस्या वारंवार उद्भवत आहे ही समस्या कायमस्वरूपी कशी सुटेल याकडे बँकेच्या व्यवस्थापकांनी लक्ष देण्याची गरज आहे


