आरमोरी- दिनांक १८ व १९ मार्च रोजी जिल्ह्यातील अनेक भागात गररपीटीसह अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. आरमोरी तालुक्यातही गारपीटीसह मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी लावलेले मका,हरभरा, गहू व भाजीपाला पिकांची मोठी नुकसान झाली आहे.
आज दिनांक २० मार्चला गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी आरमोरी तालुक्यातील शंकरनगर या गावी जाऊन,तेथील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या मका व भाजीपाला पिकांची पाहणी केली. व प्रत्यक्ष त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. व शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले.यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना यांच्यासोबत आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट,तलाठी खोब्रागडे व शंकरनगर येथील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

