Home देसाईगंज वडसा वाढीव पाणीपट्टी करा विरोधात देसाईगंज शहर काँग्रेसचे आंदोलन

वाढीव पाणीपट्टी करा विरोधात देसाईगंज शहर काँग्रेसचे आंदोलन

0
30

 

 

नगर पालिकेसमोर फोडणार मडके, मुख्याधिकाऱ्यांना घेराव

 

देसाईगंज-

शहराच्या विविध वार्डात पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या निर्माण झाली असताना यावर तोडगा काढण्याऐवजी पाणीपट्टी करात प्रचंड वाढ करून शहरातील गोरगरीबांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा घाट घातल्या जात आहे.ही अतिशय गंभीर बाब असल्याने वाढीव पाणीपट्टी कर तत्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा विरोधात नगर परिषद कार्यालयासमोर मडका फोडो आंदोलन करून मुख्याधिकाऱ्यांना घेराव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.माञ यावर कोणताच तोडगा काढण्यात आला नसल्याने अखेर आज देसाईगंज शहर काँग्रेसच्या वतिने नगर परिषदेसमोर मडका फोडो आंदोलन करून मुख्याधिकाऱ्यांना घेराव करण्यात येणार आहे.

देसाईगंज शहर काँग्रेसच्या वतिने मुख्याधिकारी डाॅ.कुलभुषण रामटेके यांना दिलेल्या नोटिसीत नमुद करण्यात आले होते की देसाईगंज शहराच्या गांधीवार्ड, हेटीवार्ड,तुकुमवार्ड,

हनुमानवार्ड,कस्तुरबावार्ड,

आंबेडकर वार्डात ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या निर्माण झाली आहे.शहरातील नागरिकांना एकवेळच्या पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असताना पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नविन पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आणल्या गेली.माञ अद्यापही कार्यान्वित केली गेली नसल्याने शहरवाशियांना पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

देसाईगंज नगर परिषदेत लोकल बाडी कार्यरत नसल्याने नगर परिषदेचा कारभार मागील कित्येक महिण्यांपासुन प्रशासकाच्या हातात आहे.दरम्यान प्रशासकाने शहरवाशियांची समस्या सोडवण्याऐवजी आपल्या स्तरावर तुघलकी निर्णय घेऊन १ एप्रिल २०२३ पासून पाणीपट्टी करात भरमसाठ वाढ करून शहरातील गोरगरीब जनता,छोटे व्यापारी, दुकानदारांचे कंबरडे मोडले आहे.यामुळे संबंधितांना अधिकच अडचणींचा सामना करावा लागणार असुन यामुळे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे जे की अन्यायकारक आहे.

तथापि ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयाला तत्काळ स्थगिती देऊन वाढीव पाणीपट्टी कर तत्काळ रद्द करून होणारा अन्याय, अत्याचार थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. माञ याबाबत देसाईगंज नगर परिषदेच्या वतीने कुठलाच निर्णय घेण्यात आला नसल्याने अखेर देसाईगंज शहर काँग्रेसच्या वतिने नगर परिषद कार्यालया समोर मडका फोडो आंदोलन करून मुख्याधिकाऱ्यांना घेराव करण्यात येणार असल्याने या आंदोलनात शहरावाशियांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देसाईगंज शहर काँग्रेस व तालुका महिला काँग्रेसच्या वतिने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here