सावंगी येथे नविन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण
देसाईगंज/
देसाईगंज तालुक्यातील मौजा सावंगी येथील नविन अंगणवाडी केंद्र क्रमांक 22 चे लोकार्पण सोहळा आज आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांचे हस्ते पार पडले.
या सोहळ्याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे, सौ. रोशनीताई पारधी माजी बालकल्याण सभापती जि. पं गडचिरोली, सौ. रेवताताई अनोले माजी सभापती पं. स देसाईगंज, सौ. प्रभाताई ढोरे सरपंच ग्रा पं. सावंगी, श्री. सुमंतजी मेश्राम उपसरपंच, श्री अश्पाकजी सय्यद तंटा मुक्त अध्यक्ष, श्री. राजुजी कुरेशी ग्रा पं. सदस्य, श्री. रजनिकांतजी गुरनुले ग्रा पं सदस्य, श्री. देवानंदजी बन्सोड ग्रा पं. सदस्य, सौ.शालिनीताई मेश्राम ग्रां पं. सदस्या, सौ. मिराताई पेलणे ग्रा पं. सदस्या, सौ नैनाताई सहारे ग्रा पं. सदस्या, सौ स्नेहाताई गुरनुले ग्रा पं. सदस्या, श्री. प्रमोदजी सहारे, श्री. मनोजजी ढोरे, श्री. शामरावजी अनोले, ग्रा. पं. कर्मचारी व अंगणवाडी सेविका व गावातील नागरीक उपस्थित होते.

