किष्टापूर येथे भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
किष्टापूर : विरबाबुराव शेडमाके युवा क्लब, किष्टापूर यांच्या वतीने आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल १५ ते २० दिवस चाललेल्या या स्पर्धेत अहेरी तालुक्यासह शेजारील छत्तीसगड राज्यातील संघांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेचा अंतिम सामना दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत रोमांचक वातावरणात खेळविण्यात आला. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन पाहायला मिळाले.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:
🔹 प्रथम पारितोषिक – वाढेल सी.सी. पटणम गाव, छत्तीसगड
रक्कम: ₹२२,२२२/-
🔹 द्वितीय पारितोषिक – किष्टापूर संघ
रक्कम: ₹१५,५५५/-
🔹 तृतीय पारितोषिक – किष्टापूर येथील खेळाडू संघ
रक्कम: ₹११,१११/-

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु. अमृता तोरेम होत्या. तसेच किष्टापूर-दोड कोजेड ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश वेलादी, देचली ग्रामपंचायतीचे उपसरपंच शाम मडावी, सदस्य रुपेश करेंगुला, अहेरी नगर पंचायतचे नगरसेवक श्रीनिवास भाऊ चटारे, श्रीनिवास भाऊ विरगोंनवार, सुमीत मोटकूरवार, स्वप्नील श्रीरामवार, राज मडावी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.