Home Breaking News *डॉ. प्रणय खुणे, गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्वांगीण...

*डॉ. प्रणय खुणे, गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध !..*

0
43
*काली माता उत्सव पलासपूर व श्याम नगर येथे सदिच्छा भेट !*

रेगडी : दिनांक 22 ऑक्टोबर 2025, रोजी गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील विकासपल्ली, श्यामनगर, शिमूलतला, पलासपुर, येथील बंगाली
दरवर्षी दिवाळीच्या पावन पर्वावर प्रत्येक बंगाली समाजाच्या गावात काली माता उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या उत्सवाहा दरम्यान समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे – डॉ. प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी.जिल्हा गडचिरोली. यावेळी आपले मत व्यक्त केले.

यावेळी गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील विकासपल्ली, पलासपूर, शामनगर शिमूलतला या गावातील तमाम बंगाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे व जोपर्यंत येथील रहिवासी बंगाली बांधवांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी केले. व सांगितले या भागात राहणाऱ्या समस्त बंगाली समाजातील नागरिकांच्या जमिनी वर्ग एक झाले पाहिजे,सर्वांना जातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे व विविध समस्या राज्य सरकारने तात्काळ सोडवण्यासाठी कटीबद्ध आहे. असे सांगितले.दरवर्षी दिवाळीच्या पावन पर्वावर प्रत्येक बंगाली समाजाच्या गावात काली माता उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या उत्सवात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जेष्ठ नेते भारतजी खटी, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी. सहभागी झाले होते,यावेळी डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी काली माता उत्सव पलासपूर व श्याम नगर येथे सदिच्छा भेट दिली व आपल्या भावना व्यक्त करीत आणि उपस्थित असलेल्या तमाम नागरिकांना मार्गदर्शन केले. व सुरू असलेल्या दिपावली, भाऊबीजेच्या तसेच नववर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here