Home आरमोरी युवारंग च्या निशुल्क समर कॅम्प मध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी घेतले योग प्रशिक्षणाचे धडे.

युवारंग च्या निशुल्क समर कॅम्प मध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी घेतले योग प्रशिक्षणाचे धडे.

0
28

करे योग, रहे निरोग :- धनराजजी कांबळे

आरमोरी :- युवारंग तर्फे दिनांक २६ एप्रिल २०२३ पासून सुरू झालेल्या निशुल्क समर कॅम्प मध्ये आज दिनांक  २९ एप्रिल २०२३ शनिवार ला राष्ट्रीय स्तराचे योग प्रशिक्षक मा. धनराज कांबळे सर  यांच्या मार्गदर्शनात  विद्यार्थ्यांना योगा चे प्रशिक्षण देण्यात आले ज्यामध्ये  पद्मासन ,मंडुकासन जानुशिरासन आकर्णधनुरासन ,पश्चिमोत्तासन ,गोमुखासन तर प्राणायाम मध्ये अनुलोमविलोम ,कपालभाती , भस्त्रिका , भ्रामरी , उद्गीद सर्व आसन व प्राणायाम नियमित रोज करून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला सक्षम व समृद्ध बनवावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी युवारंग चे उपाध्यक्ष मा.मनोज गेडाम सर , युवारंग निशुल्क समर कॅम्प चे संयोजक रोहित बावनकर सर ,युवारंग चे सदस्य मा.पंकज इंदूरकर यांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here