Home आरमोरी जञा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची नांदी-तहसिलदार ललितकुमार लाडे

जञा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची नांदी-तहसिलदार ललितकुमार लाडे

0
34

आरमोरी- शासकीय योजना ही लोकाभिमुख आहे गतिमान करण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांनी याचा पुरेपूर फायदा घेऊन जञा शासकीय ही योजना सर्व सामान्य नागरिकांसाठी विकासाची नांदी ठरली आहे असे प्रतिपादन आरमोरीचे तहसिलदार ललितकुमार लाडे यांनी केले आहे ते आरमोरी तालुक्यातील कासवी येथील शासकीय योजनांची जञा कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक माजी आमदार आंनदराव गेडाम,प्रमुख पाहूणे माजी जि.प.सदस्या मनिषा दोनाडकर,नायब तहसिलदार संजय राठोड,नायब तहसिलदार हरीदास दोनाडकर,नायब तहसिलदार विलास तुपट,सहाय्यक सवर्ग विकास अधिकारी अशोक कुर्झेकर,सरपंच सतिश गुरनुले,बालाविकास अधिकारी किर्तिकुमार कटरे,तालुका कृषि अधिकारी जोत्सना घरत,जोगिसाखराचे उपसरपंच संदिप ठाकूर,उपकार्यकारी अभियंता संजय बोबडे,उपसरपंच प्रविण ठेगंरी,पो.पा.बाळकृष्ण सडमाके,ग्रा.पं.सदस्य केशव मट्टे,उदाराम दिघोरे,रेखा राऊत,पुजा गुरनुले,अमिषा कांदोर,पञकार प्रविण राहटे,त.मु.अ.वामन मरस्कोल्हे,आसाराम प्रधान आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार आंनदराव गेडाम म्हणाले की,शेतकऱ्यांनी शेतीत धानाचे उत्पादन न घेता इतर पिकाची लागवड करावी जेणेकरून तंञकुशलतेची जोड शेतीला देऊन शेती अधिक सुलभ होईल त्याच्या प्रभावी माध्यमातून शेती आणि शेतकरी दोन्हीनाही बळ मिळेल या जञेच्या माध्यमातून लोकामध्ये जाऊन सोडवावेत असे मत माजी आमदार गेडाम यांनी सांगितले
यावेळी मा.जि.प.सदस्या मनिषा दोनाडकर यांनी सांगितले की,बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी आपली आर्थिक उन्नती साधून स्वताच्या पायावर उभे होऊन जञेच्या माध्यमातून महिलांना विकासाचे अभियान हे शासकीय योजनांची जञा हे विकास ठरेल असेही मनिषा दोनाडकर यांनी सांगितले
यावेळी पञकार प्रविण राहटे यांनीही जञा शासकीय योजनांची या अभियानातून अनेकांच्या जीवनामध्ये बदल घडेल.लोककल्याणाच्या योजना तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचाव्या हा उद्देश शासकीय योजनांचा असेही प्रविण राहटे यांनी सांगितले.
यावेळी प्रास्तविक नायब तहसिलदार संजय राठोड यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन तलाठी संकेत काञटवार,तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी गुरुदास कुमरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकार चंद्रशेखर नागापुरे, तलाठी माधुरी उईके,रेणुका करंबे,दिलीप जौंजालकर,बि.एल वनकर,शशिकांत सिडाम,नितिन उंदिरवाडे,जनार्धन पुसाम सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here