Home आरमोरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपोषणाला यश नगर परिषद आरमोरीणे मान्य केल्या मागण्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपोषणाला यश नगर परिषद आरमोरीणे मान्य केल्या मागण्या

0
51

आरमोरी नगरातील मुलभूत समस्या ताबडतोब निकाली काढण्यासाठी दिनांक ६ मार्च २०२३ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वात नगर परीषद व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु आठवडा होवुन कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे १५ मार्च पासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व तालुका अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात आरमोरीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेसमोर आपल्या शेकडो कार्यकर्त्यासहित विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले.

आरमोरी नगरपरिषद कार्यक्षेत्रात असणाऱ्या अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, सर्व गोरगरीब जनतेचे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर असलेले घरकुल बांधकाम सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी,ज्या घरकुल लाभार्थींचे बांधकाम पुर्ण झाले त्या लाभार्थींच्या बँक खात्यात त्वरीत अनुदान जमा करावे, नगरातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी दररोज मुबलक प्रमाणात पुरविण्यात यावी, नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, आरमोरी नगरपरिषद अंतर्गत स्वच्छता कंत्राट देण्यात आले आहे. परंतू सदर कंत्राटदार हा संपुर्ण शहराची स्वच्छता करीत नसल्याने संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकून संपूर्ण धनादेश थांबविण्यात यावे. नगराची स्वच्छता न करता स्वच्छतेचे धनादेश कंत्राटदाराला देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांचे शेवटचे बांधकाम पुर्ण झाले आहे त्यांना बांधकामाचे पुर्ण अनुदान अदा करण्यात यावा.
या समस्यांचे एका आठवडाभरात निराकरण करण्यास नगर परीषद व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते . परंतु वरील कोणत्याही मागण्या मान्य न झाल्या मुळे नगरपरिषद कार्यालयासमोर समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपोषण करण्यात आले. अखेर नगर परिषद चे स्वच्छता व आरोग्य सभापती भारत बावनथडे, पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, शहर अभियंता अविनाश बंडावार, कार्यालयीन अधीक्षक आशिष हेमके यांच्या मध्यस्थीत उपोषण करत्यांशी चर्चा करून मागण्यावर निराकरण काढण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस चे आरमोरी तालुका अध्यक्ष संदीप ठाकूर यांनी उपोषणात उपस्थित असलेल्या शहरातील नागरिकांना व आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना मान्य केलेल्या अटीच्या पाढा वाचून, आपली हमी आहे काय? असे विचारून सर्वांनी मान्य केल्यानंतरच उपोषण मागे घेतला. उपोषणाचे शेवट भारत बावनथडे व विलास पारधी यांनी संदीप ठाकूर यांना दिलेल्या निंबू पाण्याने झाले. शेवटी संदीप ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद आरमोरी समोर चालू असलेल्या उपोषणाचीं यशस्वी सांगता झाली.
उपोषणदरम्यान काही अनुचित घटना होऊ नये म्हणून आरमोरी ठाण्याचे ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या नेतृत्वात पोलिसांचे कडक बंदोबस्त ठेवन्याय आले होते ..
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष संदीप ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष अमिन लालानी, ओ बी सी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सदाशिव भांडेकर , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन लांचेवार , शहर अध्यक्ष प्रदिप हजारे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अनवर सय्यद, तालुका युवती अध्यक्ष हसीना ठवरे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा ज्योती सोनकुसरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा ज्योती घुटके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिवाकर गराडे, प्रफुल राचमलवार,मुकुंदा कुकडकार, दिवाकर मेश्राम, अमित खरकाटे ,बाळू ठाकरे ,प्रतिभा दुमाने, मंगला मेश्राम, माया मेश्राम, सरस्वती खरकाटे ,शीला धारणे, मंजुळा दुमाने, कौशल्या कांबळे, सुमित्रा कांबळे, बेबी मेश्राम, अनुसया कांबळे, सुशीला दुगा, राधा शिंदे, गुलशन पठाण ,लीला लांजेवार, भागरता कांबळे, फिरोज पठाण, सुनीता दुमाने,मनोरमा डोंगरवार यासहित शेकडो महिला उपोषणाला बसल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here