Home आरमोरी समाजकार्य करून केला वाढदिवस साजरा

समाजकार्य करून केला वाढदिवस साजरा

0
51

दिनांक 15 मार्च 2023 रोजी आरमोरी येथील युवारंग चे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते व आरमोरी अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष मा. प्रफुलजी खापरे व आरमोरी येथिल नृत्य दिग्दर्शक मा. करण कुथे यांच्या वाढदिवसा निमित्त आरमोरी येथील संत गाडगेबाबा मतिमंद विद्यालय येथे दैनंदीन उपयोगात येणारे शाळेचे साहित्य तसेच अल्पोपहार वितरित करण्यात आले व मुलांच्या आरोग्याविषयी व विविध विषयांवर चर्चा करण्यात आले, या कार्यक्रमाप्रसगी आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते मा.प्रफुल मोगरे, अजय कुथे,राहुल इंकणे,बादल सपाटे, अजय हेडाऊ,राहुल हर्षे, सूरज हजारे,अंकुश गेडाम,फिरोज पठाण,चेतन जुआरे, नेपचंद्र पेलणे,महेश पेलणे,स्वप्नील सोरते,शुभम इंकणे,नितीन खापरे व विद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here