Home आरमोरी आरमोरी येथे एकदिवसीय गो आधारित शेती प्रशिक्षण संपन्न**

आरमोरी येथे एकदिवसीय गो आधारित शेती प्रशिक्षण संपन्न**

0
33

आरमोरी :—तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी एकदिवसीय गोआ आधारित शेती प्रशिक्षण कार्यक्रम तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाच्या पटांगणात संपन्न झाला
सदर प्रशिक्षण कार्यक्रम पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय शेती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री राकेश शेलोकर व श्री प्रतीक कहू गो अनुसंधान देवलापार हे होते प्रशिक्षणाचे अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्ह्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर विलास गाडगे हे प्रामुख्याने होते प्रशिक्षणाची प्रस्तावना डॉक्टर दीपक मदी कुंटावार सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आरमोरी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉक्टर लीना धोटे यांनी केले कार्यक्रमाला मार्गदर्शन पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉक्टर महेश बिपटे पंचायत समिती आरमोरी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील पशु सखीनी व शेतकऱ्यांनी आणि पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here