Home आरमोरी सामाजिक बांधिलकी जोपासून केला वाढदिवस साजरा

सामाजिक बांधिलकी जोपासून केला वाढदिवस साजरा

0
18

 

आरमोरी…..

स्वतः साठी तर सारे जगतात, पण पण समाजासाठी जगणारे खुप कमी व्यक्ती आपल्या समाजात असतात. त्यातीलच एक युवा सामाजिक कार्यकर्ते जे नेहमी सामाजिक, सांस्कृतिक , शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात युवकांच्या मागे खंबीरपणे उभे असतात इतरांच्या मदतीला धावतात असे नंदूजी नाकतोडे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून युवामंच सामाजिक संघटना आरमोरी तसेच आरमोरी येथील युवकांनी पुढाकार घेऊन संत गाडगे महाराज मतिमंद शाळा येथील मुलांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेल्या बसण्यासाठी खुर्च्या, चटई शैक्षणिक साहित्य व फळ यांचा वाटप केला.

तसेच आरमोरी शहरातील रस्त्यावरील छोटे आणि गरजू व्यावसायिक यांना ताडपत्रीचा वाटप केला .

यावेळी युवामंच चे सदस्य माजी.न.प. सभापती भारत बावनथडे, मुकुल खेवले , इंजि. राहुल तीतिरमारे, जितेंद्र ठाकरे, अमोल खेडकर, सचिन गणवीर, थामेश्वर मैंद, अमित राठोड, संजय सोनटक्के तसेच संत गाडगे महाराज मतिमंद शाळा येथील बोडे सर, जुमनाके सर विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here