सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची तहशिलदार श्रीहरी माने यांच्या कडे निवेदनातून मागणी
जोगीसाखरा- तालुक्यातील पाथरगोटा, पळसगाव, शंकरनगर, जोगीसाखरा, रामपूर परिसरात काल १९ मार्च ला सयकाळी ४ वाजताच्या सुमारास आलेल्या अवकाळी चक्रिवादळ, गारपिटीने रबी मका कारली चवळी धान पिकांचे व नागरीकांच्या कवेलूच्या घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वे करून मदत करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची तहशिलदार श्रीहरी माने यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
पावसाळी धान पिकाच्या उत्पन्नात सातत्याने घट येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना उन्हाळी पिकात उत्पादन वाढ होऊन आपला कृटुबाचा गाडा सुरळीत चालण्यासाठी मदत होतें यासाठी दरवर्षी पाथरगोटा, शंकरनगर, पळसगाव,जोगीसाखरा, रामपूर कासवी आष्टा अतरजी सालमारा परिसरातील शेतकऱ्यांनी उसनवार व्याजाने कर्ज काढून रबी धान व मका कारली चवळी पिकाची लागवड केली होती. परंतु अंतिम टप्प्यात असलेले पिके काल सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या गारपिट व चक्रीवादळाने सर्वात जास्त मका पिक जवळपास पाचशे सहाशे हेक्टर च्या वरुण चक्रीवादळ व गारपिटीने नष्ट झाले. याशिवाय कारली, आंबे, केळी, चिकू, पपई हे पिकही शेतात कोसळून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांना दिली. सदर बाबीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांनी पाथरगोटा, शंकरनगर, पळसगाव, जोगीसाखरा, रामपूर आष्टा कासवी सालमारा अंतरजी यासह अन्य गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन पिकाची पाहणी केली. यात लाखो रुपयाची नुकसान शेतकऱ्यांची झाल्याचे दिसले यावरुन रबी पिक मका कारली चवळी धान ईतर पिके तसेच कवेलूच्या घराच्या नुकसानीचा सर्वे करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहशिलदार श्रीहरी माने यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
पाहणी करतेवेळी मोतीलाल लिंगायत, राजेंद्र ढोगे मिनाल राय विकास मडल भैयाजी कन्नाके शालिक राऊत विलास दोनाडकर रामचंद्र अलोने देवचद दोनाडकर दिवाकर भुते विठ्ठल मेत्राम राजु मेत्राम यादो मेत्राम प्रदिप कराकर शेखर बगमारे काशीनाथ दोनाडकर वासुदेव चौधरी हरीदास कराकर आदी उपस्थित होते.
यासमधी आरमोरी चे तहशिलदार श्रीहरी माने यांनी सांगितले की चक्रीवादळ व गारपिटीने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना तलाठी व ग्रामसेवक कृषी सेवक यांना दिली आहे तशी माहिती जिल्हाधिकारी यांना दिली आहे. अहवाल आल्यानंतर वरीष्ठ पातळीवर पाठविले जाईल असे आश्वासन दिले.


