Home आरमोरी वत्सलाबाई वनमाळी स्कुल आफ स्कालर विद्यालयात गणित दिवस साजरा

वत्सलाबाई वनमाळी स्कुल आफ स्कालर विद्यालयात गणित दिवस साजरा

0
29

आरमोरी .

 

गणित विषयाबद्दलची भीती दूर करा

प्रा. के.टी किरणापुरे यांचे प्रतिपादन

 

 

 

मराठी विज्ञान परिषदेचा पुढाकार

 

मानवी जीवनात गणित या विषयाचे महत्त्व अधिक असून या विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे व थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून मराठी विज्ञान परिषद शाखा आरमोरीच्या वतीने वत्सलाबाई वनमाळी स्कूल आफ स्कॉलर आरमोरी येते राष्ट्रीय गणित दिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला .

यावेळी ‌मराठी विज्ञान परिषद विभाग प्रमुख प्रा. डॉ.के.टी.किरणापूरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये गणित या विषया बद्दल भिंती नबाळगता गणित विषया बद्दल आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून गणित तज्ञ श्रीनिवास रामानुज यांच्या संदर्भातले विविध उदाहरणे देऊन गणित विषयाचे महत्त्व पटवून दिले व विद्यार्थ्यांना गणित विषयाबद्दलची भीती मनातून काढून टाका असा मोलाचा मार्गदर्शन केला.यावेळी मुख्य प्रमुख अतिथी मुख्याध्यापक नितीन कासार व गुलनाज शेख ह्यांनी विद्यार्थ्यांना गणितीय सूत्राच्या माध्यमातून गणित सोडवण्याचे विशेष असे महत्त्व ‌पटवून सांगितले.

यावेळी व्यासपीठावर प्रा.के.टी. किरणापुरे‌ मुख्याध्यापक नितिन कासार ,हरेश बावणकर, गुलनाज शेख , शिवांगी राऊत उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणितीय माडेलचे मुल्यांकन प्रा .के. टी. किरणापुरे व हरेश बावणकर यांनी केले तर सुत्रसंचालन शिवांगी राऊत हिने केले तर आभार गुलनाझ शेख हिने मानले. सहकार्य शैलेश उरकुडे सर व इतर कर्मचारी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here